पंजाब डख यांचा नवा अंदाज जाहीर या आठवड्यात पाऊस होईल का ? पहा हा अंदाज ! Punjab Dakh Hawaman Andaj

Punjab Dakh Hawaman Andaj नमस्कार मित्रांनो हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी या आठवड्यातील हवामानाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याचे वातावरण अंशतः ढगाळ असले तरी राज्यात पावसाची शक्यता नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी यामुळे चिंता करण्याची गरज नाही.

राज्यातील कोणत्याही भागात पाऊस पडण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपले नियोजन करावे, असे डख यांनी सांगितले आहे.

त्यांच्या मते सध्याच्या हवामान स्थितीमुळे शेतकऱ्यांनी हरभरा आणि गव्हाची पेरणी करून घ्यावी. तसेच, पाण्याची गरज असल्यास पाणी देण्यास हिच वेळ योग्य असून, पावसाची वाट पाहू नये.

Punjab Dakh Hawaman Andaj 2024

📢 हे पण वाचा :- मुंबई सीमा शुल्क आयुक्तालय अंतर्गत 10वी 12वी पासवर मोठी भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !

अंशता ढगाळ वातावरणामुळे पेरणी केलेल्या हरभरा पिकावर एक प्रभावी बुरशीनाशक आणि किटकनाशक फवारणी करून संरक्षण करणे आवश्यक आहे. राज्यात ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडण्याची शक्यता कुठेही नाही, हेही डख यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment