Electricity Bill Increase Maharashtra :- आजचा लेखामध्ये सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी तसेच सर्वसामान्यांना नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यातील जनतेला वीज बिलाचा फटका बसला आहे. आणि आज पासून वीज बिल पुन्हा महागले आहेत.
Electricity Bill Increase Maharashtra
याचा परिणाम थेट सर्वसामान्य जनतेवर होणार आहे. दर महिन्याला वीज वापरासाठी अधिक शुल्क द्यावे लागणार आहेत. आता महाराष्ट्र निर्माण आयोग म्हणजेच एमआरसी ने 1 एप्रिल 2023 पासून नवीन दर लागू केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने 4 वीज वितरण कंपन्या आहेत. या वितरण कंपनी कोणत्या आहेत तसेच महावितरण म्हणजे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड ही राज्य सरकार चालवते, याचे सुद्धा दर वाढले आहेत तर हे दर किती वाढले आहेत पुढे वाचा. आता चार कंपन्यांचे नवीन दर काय आहे जाणून घ्या.
नवीन वीज बिल दर 2023
सर्वप्रथम महावितरणचे दर जाणून घ्या महावितरण 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 2.9% आणि 2024-25 साठी 5.6% वाढ केली आहे. यावरील 2025 पर्यंत निवासी वीज दरामध्ये 6% वाढ केली जाणार आहेत. औद्योगिक वीजदर आर्थिक वर्ष 2024 मध्ये 1% आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 4% वाढ होईल.
टाटा पॉवरचे नवीन वीज बिल दर ?
टाटा पॉवर 2024 साठी 11.9% आणि 2025 साठी 12.2% दर वाढवले आहेत. या वाढीमुळे निवास विशेष दरार्थी विषय 2024 मध्ये 10% आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 21% ने वाढणार आहे. आदनी इलेक्ट्रिसिटीचे नवीन दर काय आहे ? :- आदनी इलेक्ट्रिसिटी मध्ये 2024 साठी 2.2% आणि 2025 साठी 2.1% दरवाढ झाली आहे.
best electricity rate
आता सर्वोत्तम नवीन दर काय आहेत ?, कोणती कंपनी हे सर्वोत्तम वीज दर देत आहे ?. बेस्ट अर्थात बृहन्मुंबई विद्युत पुरवठा परिवहने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 5.1% आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये 6.3% ने वीज दर वाढवले आहेत. यासोबत परिणामी निवासी वीजदर 2024 मध्ये 6.19 टक्के आणि 2025 मध्ये 6.7% इतके दर टक्के ने वाढणार आहेत. अशाप्रकारे वीज बिल दर आहेत.
RTE Admission अंतर्गत मोफत प्रवेश लॉटरी या तारखेला लागणार पहा लॉटरी दिनांक !
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 📢 ICICI बँक होम लोन कर्ज योजना अर्ज सुरु पहा संपूर्ण माहिती :- येथे पहा