Pradhan Mantri Jan Dhan Yojana: 2 लाखांचा अपघात विमा, डेबिट कार्ड आणि बरंच काही… जाणून घ्या PMJDY चे फायदे!

मित्रांनो या Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY) ने 10 वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी लाल किल्ल्यावरून विश्वास यांना घोषित केली.

त्या नंतर 28 ऑगस्ट 2014 रोजी ह्या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे बँकिंग सेवांपासून वंचित असलेल्या आणि बँक खातं नसलेल्या लोकांसाठी बँक खाती उघडणे.

योजनेच्या अंतर्गत, खातेदारांसाठी अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्या, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधारणा झाली आहे. आजवर प्रधानमंत्री जन धन योजने अंतर्गत 53.13 कोटी बँक खाती उघडली गेली आहेत, ज्यामध्ये एकूण 2,31,236 कोटी रुपये जमा आहेत.

या खात्यांपैकी 66.6 टक्के म्हणजेच 35.37 कोटी खाती ग्रामीण आणि निमशहरी भागात उघडण्यात आलेली आहेत. याशिवाय, एकूण खात्यांपैकी 55.6 टक्के म्हणजेच 29.55 कोटींहून (PMJDY) अधिक खाती महिलांच्या नावावर आहेत.

Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2024

या योजनेंतर्गत उघडलेली बँक खाती शून्य शिल्लक असतात, म्हणजेच खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नसते. खातेदारांना मोफत रुपे डेबिट कार्ड आणि दहा हजार रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळते.

तसेच, एकूण 36.14 कोटींहून अधिक रुपे डेबिट कार्ड जारी करण्यात आली आहेत आणि या कार्डांवर 2 लाख रुपयांचे मोफत अपघात विमा संरक्षण प्रदान केले जाते.

Leave a Comment