115 महिन्यांत पैसे दुप्पट, पहा पोस्ट ऑफिसची ही सुपरहिट योजना कसे होणार तुमचे पैसे दुप्पट ? Post Office Scheme

Post Office Scheme : मित्रानो आजच्या काळात गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असले तरी अनेक लोक जे आपल्या कष्टाच्या पैशांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी सरकारी योजनांकडे वळतात. सामान्यता असा समज असतो की सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास परतावा तुलनेने कमी मिळतो.

पण काही सरकारी योजना अशा आहेत ज्या चांगला परतावा देतात आणि त्याचबरोबर तुमची गुंतवणूक देखील सुरक्षित ठेवतात. आज आपण अशाच एका जबरदस्त योजने विषयी माहिती आपण या लेखात जाणुन घेणार आहोत.

ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र (KVP) योजना. या योजनेत सध्या वार्षिक 7.5% दराने व्याज दिले जात आहे. भारत सरकारच्या देख रेखीखाली चालवल्या जाणाऱ्या या योजनेत एकरकमी रक्कम गुंतवावी लागते व या वर तुम्हाला तिमाही आधारावर व्याज मिळते.

Post Office Scheme 2024

📢 हे पण वाचा :- पश्चिम रेल्वेत निघाली नवीन 10वी 12वी ITI पासवर भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !

या योजनेची एक खासियत म्हणजे, ठराविक कालावधीत तुम्ही तुमची गुंतवणूक दुप्पट करू शकता. यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तुमचे खाते उघडू शकता.

किसान विकास पत्र योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते व गुंतवणुकीसाठी कोणतीही याला मर्यादा नाही आहे. या योजनेत दरवर्षी 7.5% येवढे व्याज दर मिळत असते.

एप्रिल 2023 मध्ये या योजनेच्या व्याजदरात वाढ करण्यात आली होती जी पूर्वी 7.2% होती. यापूर्वी गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी 120 महिने लागायचे.

📢 हे पण वाचा :- शासनाचा मोठा निर्णय, आता गाय/म्हैस खरेदीसाठी मिळणार तब्बल एवढं मिळणार अनुदान, पहा सविस्तर माहिती !

पण मित्रानो आता हे कालावधी 115 महिन्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे म्हणजेच अंदाजे 9 वर्षे आणि 7 महिन्यात तुमची गुंतवणूक दुप्पट होऊ शकते.

अशा प्रकारे किसान विकास पत्र योजना तुमच्या दीर्घकालीन बचतीसाठी एक सुरक्षित आणि लाभदायक पर्याय ठरू शकतो. ही माहिती तुमच्या इतर मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ होईल का.

Leave a Comment