ड्रायव्हिंग लायसन्स हरवले? टेन्शन सोडा अन् बनवा डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स; जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ही प्रकिया इथचं ! Duplicate driving Licence

Duplicate driving Licence मित्रानो आपल्या तर माहितच आहे भारतात वाहन चालवण्यासाठी एक अत्यावश्यक कागदपत्र म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स. १९८८ च्या वाहन अधिनियमानुसार सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक आहे. जर हे लायसन्स तुमच्याकडे नसेल तर वाहन चालवणे कायद्याच्या विरोधात आहे.

समजा मित्रानो तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे पण ते खराब झाले आहे किंवा हरवले आहे तर चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता.

तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की हे डुप्लीकेट लायसन्स कसे मिळवायचे? ते अगदी सोपे आहे. आज आपण या लेखात ऑनलाइन आणि ऑफलाइन कसे करायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

Duplicate driving Licence काढण्यासाठी ऑनलाइन पद्धत

  1. परिवहन विभागाच्या अधिकृत parivahan.gov.in/parivahan/hi वेबसाइटला भेट द्या.
  2. होमपेजवर ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवांचा पर्याय निवडा.
  3. त्यानंतर, डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स या पर्यायावर क्लिक करा.
  4. तुमचे नाव, पत्ता, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, जन्मतारीख आणि इतर विचारलेली माहिती भरा.
  5. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  6. डुप्लीकेट लायसन्ससाठी अर्ज शुल्क भरा.
  7. शुल्क भरल्यानंतर एक पावती मिळेल ज्यावर अर्ज क्रमांक नमूद असेल.
  8. अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी तुमचे डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या पत्त्यावर पाठवले जाईल. डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी ऑफलाइन पद्धत
  9. जवळच्या आरटीओ कार्यालयात जा.
  10. तिथे डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज मागवा.
  11. अर्ज नीट भरून, आवश्यक कागदपत्रे आणि पासपोर्ट साइज फोटो जमा करा.
  12. अर्ज शुल्क भरून, पावती मिळवा ज्यावर अर्ज क्रमांक नमूद असेल.
  13. अर्ज भरल्यानंतर काही दिवसांनी, तुमचे डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या पत्त्यावर येईल.

हे पण वाचा :- 2 लाखांचा अपघात विमा, डेबिट कार्ड आणि बरंच काही… जाणून घ्या PMJDY चे फायदे!

मित्रानो तुम्ही वरील पध्दतीने ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने डुप्लीकेट लायसन्स मिळवू शकता. काहीवेळा लायसन्स काढल्यानंतर कार्ड हातात येण्यासाठी एक ते दीड महिना लागतो.

या दरम्यान गाडी चालवता येईल का असा प्रश्न पडतो. अशा परिस्थितीत डिजिलॉकर या सरकारमान्य अधिकृत अपचा वापर करून तुम्ही ऑनलाइन लायसन्स मिळवू शकता आणि वाहन चालवण्याचा अधिकार प्राप्त करू शकता.

Leave a Comment